शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या अभिजातसाठी आता दिल्लीत आंदोलन-२६ जानेवारी; ठोस निर्णय घेण्याचे हवे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:41 IST

सातारा : ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत.

सातारा : ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सुधारित कॅबिनेट नोट तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पत्राद्वारे कळवले होते. परंतु कोणतीच कार्यवाही झालेली नाही. २७ फेब्रुवारी २०१८ पूर्वी याबाबत निर्णय घेऊन आश्वासन द्यावे, यासाठी २६ जानेवारीला पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिला.कुलकर्णी म्हणाले, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री विनोद तावडे यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता. त्याचबरोबर मसाप, शाहूपुरी शाखेच्या वतीने एक लाख पत्रे पंतप्रधान कार्यालयाला पाठविली होती. २१ फेब्रुवारी २०१७ ला पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र पाठवले होते. त्यात २८ एप्रिल २०१५ ला प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे सादर होऊन दोन वर्षे होत आली तरी या प्रस्तावाबाबत काय स्थिती, याची विचारणा केली होती.पंतप्रधान कार्यालयाने पत्राची दखल घेऊन सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठवले होते तसा पत्रव्यवहारही पंतप्रधान कार्यालयाने केला. सांस्कृतिक मंत्रालयाचे अवर सचिव कवरजित सिंग यांनी २१ मार्च २०१७ पत्र पाठवून त्यात मद्रास उच्च न्यायालयात या प्रश्नाबाबत असलेली याचिका न्यायालयाने ८ आॅगस्टमध्येच २०१६ निकाली काढली आहे. त्यामुुळे सांस्कृतिक मंत्रालयाने पुन्हा एकदा कृतिशील कार्यवाही सुरू केल्याचे कळवले होते. त्यानंतर भिलार येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असता पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. जूनमध्ये पुन्हा पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असता ६ जुलै २०१७ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल लक्षात घेता एक सुधारित कॅबिनेट नोट प्रक्रिया सुरू असल्याचे कळवले होते. परंतु त्यानंतर सहा महिने झाले तरी याबाबत ठोस अशी कोणतीच कारवाही झालेली दिसत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीचा विकास होणार असून, ११ कोटी मराठी जनतेच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून महाराष्टÑात साजरा केला जातो. त्यापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावे, यासाठी आंदोलन करणार आहे.यावेळी मार्गदर्शक किशोर बेडकिहाळ, नंदकुमार सावंत, अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, डॉ. उमेश करंबळेकर उपस्थित होते.रंगनाथ पठारे यांच्याकडून पाठिंबामराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा, यासाठी अहवाल तयार करण्याची जबाबदारी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे दिली होती. या समितीने अहवाल तयार करून साहित्य अकादमीकडे दिल्यानंतर अकादमीने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला. त्यानंतर दोन वर्षे प्रस्ताव धूळखात पडला. फेब्रुवारी २०१७ मध्ये पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहारानंतर प्रस्तावाची स्थिती समजली. त्यानंतर पाठपुराव्याची माहिती प्रा. रंगनाथ पठारे यांना समजल्यानंतर त्यांनीही पाठिंबा दिला असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.